“ओबीसींना 10 टक्के आरक्षण वाढवून देऊन आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करा”

“ओबीसींना 10 टक्के आरक्षण वाढवून देऊन आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करा”

नवी दिल्ली | सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या ओबीसींना 10 टक्के आरक्षण देण्याचा आता विचार करायला हवा, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ‘संडे एक्सप्रेस’शी ते बोलत होते.

आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या सवर्णांना सरकारने आरक्षण दिले. आता ओबीसीमधील आर्थिकदृष्ट्या मागासांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 आरक्षण द्यावे, असं त्यांनी म्हटलं आहे.

ओबीसींचे आरक्षण 27 टक्क्यांवरुन 37 टक्के करायला हवं आणि यातील अत्यंत गरीब व्यक्तींसाठी वेगळा उपवर्ग तयार करायला हवा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“राज्याच्या मंत्रीमंडळात एक तरी शेतकऱ्याचं पोरगं दिसतंय का”??

-“बच्चू भाऊ, या सरकारमध्ये दम नाही, दम आहे तो फक्त तुमच्यात”

-भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला की मोदी घरात बसणं पसंत करतात- राहुल गांधी

-“बीडचा खासदार निवडून द्या, RSS वाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकतो”

-गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारे गुजरात ठरले पहिले राज्य

 

Google+ Linkedin