बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तरी देखील आदित्य ठाकरेंना मला साहेब बोलावं लागतं”, अन् रामदास कदमांना रडू कोसळलं!

मुंबई | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) कामकाजावर टीका केली. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार आणि आघाडीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही शिवसेना फोडल्याचा आरोप केला.

मी आज 70 वर्षांचा आहे आणि गेली 52 वर्षे मी शिवसेनेसाठी काम केलं. शिवसेनेसाठी आंदोलन करत अनेक केसेस अंगावर घेतल्या आणि शिवसेनेची पायाभरणी केली. तिच शिवसेना आता संपायच्या मार्गावर आहे, हे पाहून मला वाईट वाटते म्हणत, त्यांना रडू कोसळले. आदित्य ठाकरे माझ्या कॅबिनमध्ये येतात आणि मला बैठका घेण्याचे आदेश देतात. या वयात आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावे लागते. याची खंत वाटते, असे यावेळी रामदास कदम म्हणाले.

शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव साधला. अजित पवारांकडे (Ajit Pawar) असलेल्या प्रचंड प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी आणि शरद पवारांनी मिळून शिवसेना तोडली, असा खळबळजनक आरोप रामदास कदमांनी केला. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असताना पवारांना शिवसेना फोडणे जमले नाही, ती त्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या काळात फोडली. शिवसेना कोसळताना पहावत नाही, असं ते म्हणाले.

पुढे बोलताना कदम म्हणाले, उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये बसून फक्त शिवसैनिकांना नारळ वाटतात. पण ते सर्व बंड करुन का उठले? याचा विचार करत नाहीत. मी येथून पुढे महाराष्ट्रात दौरे करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी शिवसेना सोडलेली नाही, माझ्या हातात अजूनही भगवा आहे.

थोडक्यात बातम्या – 

’50 वर्षात उभं केलेलं पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं’; रामदास कदम ढसाढसा रडले

‘आता प्रवाहासोबत जावं लागणार’, आणखी एका नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

“सत्तेची भांग प्यायलेले उद्या मातोश्री आणि सेना भवनावर सुद्धा कब्जा करतील”

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका

एकीकडे पूरग्रस्तांचे हाल तर दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारण सुरूये- आदित्य ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More