बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रामदास कदमांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण नाही?; अरविंद सावंतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज्यात शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत विरोधी विचारांच्या पक्षांचा हात पकडत सत्तेचा मार्ग पत्करलेला आहे. शिवसेना सत्तेत आल्यापासून पक्षातील अंतर्गत धुसफूस वाढत चाललेली दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका ऑडियो क्लिपमुळं एकच खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याचं या ऑडियो क्लिपमधून समोर आलं होतं. त्यातच आता रामदास कदमांना दसरा मेळाव्यात एन्ट्री नसल्याचं समोर आलं आहे.

शिवसेनेचा दरवर्षी होणारा दसरा मेळावा यावर्षी मुंबईच्या षन्मुखानंद सभागृहात 50% क्षमतेनं पार पडणार आहे. मागील वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कोरोनामुळं हा मेळावा शिवतीर्थावर पार पडणार नाही. मात्र, या मेळाव्यात रामदास कदम यांना प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कुणालाही निमंत्रणाची गरज नाही, असं ते म्हणाले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं आमंत्रण देण्याची पद्धत नाही. नेते, उपनेते, आमदार, खासदार हे सर्व स्वत:हून येत असतात. कोणत्याही व्यक्तीला वेगळं आमत्रंण नसतं, असं ते म्हणाले. रामदास कदम यांच्या प्रवेशबंदीची मला काहीही माहिती नाही, असं सांगायलाही अरविंद सावंत यावेळी विसरले नाहीत. 

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. किरीट सोमय्यांना रामदास कदम यांनीच माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, रामदास कदम यांनी या प्रकरणात त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत, मात्र या तसेच आणखी काही कारणांमुळे रामदास कदम यांनी मातोश्रीची नाराजी ओढवून घेतल्याची चर्चा आहे. त्यांच्या दसरा मेळाव्यातील प्रवेशबंदीचा विषय त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

थोडक्यात बातम्या –

“तुम्ही ज्या मुख्यमंत्र्याची जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण दिलं”

नात्याला काळिमा फासणारी घटना, सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार

“बहुजन आधीच उपाशी, त्यात…”; मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे संतापल्या

‘…त्याआधीच अजित पवारांनी आरक्षण रद्द केलं’; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

“शिवसेना निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं पैसा गोळा करते”; मनसेचा खळबळजनक आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More