महाराष्ट्र वर्धा

“सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध”

वर्धा | महाराष्ट्रात असलेली सत्ता टिकावण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी कृषी कायद्याला विरोध करत असल्याची जोरदार टीका वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांनी केली आहे.

वर्ध्यात खासदार रामदास तडस यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी खासदार रामदास तडस यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली.

मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचं कृषी विधेयक पारित केलं. त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांचा कृषी माल देशभरात कुठंही विकता येणार आहे. पण या शेतकरी हिताच्या विधेयकाला विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध चालवला आहे, असं तडस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘पोलीस दलात 33 टक्के महिलांची भरती करा’; या महिला शिवसेना आमदाराची मागणी

भाजपने आपल्या पुण्यातील ‘या’ नेत्याकडे सोपवली एक मोठी जबाबदारी!

राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चा असतानाच एकनाथ खडसेंना शिवेसेनेकडून ऑफर

राजस्थानमध्ये बलात्कार झाला तेव्हा राहुल गांधी का गेले नाहीत- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या