बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑक्सिजन तुटवड्यावरुन रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | ऑक्सिजन तुटवड्यावरून पतंजलीचे प्रमुख रामदेव बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. धीर धरा तुम्ही कुठं मरुन चालला आहात. देवाने संपूर्ण ब्रम्हांडात ऑक्सिजन भरुन ठेवलाय. नाकाच्या रुपातील दोन सिलेंडरने ओढा, असं रामदेव बाबा म्हणाले.

बेड कमी पडलेत, औषधं कमी पडत आहेत, अंत्यसंस्काराला स्मशानभूमी कमी पडल्यात, मरतो आहे बाबा असं म्हणून चहूबाजूंनी नकारात्मक वातावरण तयार केलंय, असं मत रामदेव बाबांनी व्यक्त केलं. रामदेव बाबांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डॉक्टर म्हणतात आपल्या शरीरात नाकाच्या रुपाने दोन सिलेंडर दिलेत, पायाच्या रुपात दोन डॉक्टर दिलेत आणि हाताच्या रुपात दोन नर्सेस दिल्या आहेत. लोक या सर्व गोष्टींचा उपयोग करत नाही. याचा उपयोग करुन शरीरात ऑक्सिजन भरा, असंही रामदेव बाबांनी म्हटलंय.

कुणालाही ऑक्सिजनची कमतरता पडली तर मला सांगा. ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 80 पर्यंत खाली आली होती त्यांना मी भस्रीका, कपालभाती, अनुलोम मिलोम एक तास करायला लावून त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 98 ते 100 पर्यंत वाढवली, असंही त्यांनी सांगितलं आहे.  अनेक लोक रामदेव बाबांचं हे वक्तव्य असंवेदनशीलपणा असल्याचं म्हणत टीका करत आहेत.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

रिया चक्रवर्तीच्या ‘रिअल लाईफ हिरो’चा कोरोनाने घेतला बळी

‘गाडी विकून जे पैसे येतील ते आईला द्या, तिची काळजी घ्या’; खडकवासला धरणात उडी घेत व्यावसायिकाची आत्महत्या

कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णाची दारुपार्टी; बायको-वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धरलं अन्…

“बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”

‘हॉटेल, पर्यटन व्यावसायिकांना मदत करा’; शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More