लातूर | विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज ऐनवेळी माघारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रसची डोकेदुखी वाढवणारे रमेश कराड हे राष्ट्रवादीतच आहेत. विधानपरिषद निवडणुकीनंतर पक्ष त्यांच्यावर योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी लातूर येथील प्रचार बैठकीत दिली.
गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्यांना विधान परिषदेचं तिकीटही दिलं गेलं. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी आणि मुंडे यांच्यावर नामुष्की ओढवली.
या प्रकारानंतर रविवारी लातूर येथे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला मात्र रमेश कराड गैरहजर होते.
महत्त्वाच्या बातम्या –
-नेहरूंनी आंबेडकरांना डावलून स्वतःलाच भारतरत्न घेतला!
–पंतप्रधान होण्याचा विचार कधीच केला नाही- नितीन गडकरी
-किसान मार्चमध्ये सहभागी शेतकऱ्यांचा सरकारकडून विश्वासघात!
-गुंड बनण्यासाठी जीम जॉईन करा; भाजपच्या मंत्र्याचा वादग्रस्त सल्ला
-पोलिसांच्या पाठीमागे गाड्या पेटवल्या, औरंगाबादचा व्हीडिओ व्हायरल
Comments are closed.