बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा भन्नाट राजकीय प्रवास

मुंबई | शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनाने शिवसेनेला (Shivsena) चांगलाच धक्का बसला. रमेश लटके यांनी वयाच्या 52व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मात्र, दांडगा जनसंपर्क असलेले लटके यांचा राजकीय प्रवास भन्नाट होता.

सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार असा रमेश लटकेंचा राजकीय प्रवास आहे. गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून कारकिर्दीची सुरूवात केल्यानंतर लटके यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात नगरसेवक, शाखाप्रमुख, आमदार असा पदभार यशस्वीरित्या सांभाळला.

कट्टर शिवसैनिक व अंधेरी भागातील शिवसेनेचा विश्वासू चेहरा म्हणून ओळख असलेल्या रमेश लटकेंनी 1997 ते 2012 या काळात सलग तीन वेळेसे नगरसेवक पद भूषवलं. त्यानंतर 2014 साली लटकेंनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीतही जनतेने विश्वास दाखवत रमेश लटकेंना पुन्हा एकदा निवडून दिलं.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी रमेश लटके यांच्या अंधेरीत एका सत्कार समारंभ कार्यक्रमाला अनिल परब व एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. लटके आपल्या कुटुंबासोबत दुबईत फिरायला गेले होते. यावेळी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली. लटकेंच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

काय सांगता! पृथ्वीराजसाठी अक्षय कुमारने घेतले तब्बल ‘इतके’ कोटी, मानधन ऐकून थक्क व्हाल

‘मी पण अयोध्येला जाणार कारण मलाही…’; गुणरत्न सदावर्तेंचं मोठं वक्तव्य

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर

मोठी बातमी! शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन

‘भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष’; भाजपच्या माजी आमदाराचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More