बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार; अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा

मुंबई | देशात लोकपाल कायदा लागू करावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर तब्बल 14 दिवस आंदोलन केलं होतं. त्यानंतर देशाचं राजकारण बदललं. काँग्रेसची सत्ता कमकूवत होत गेली आणि भाजप एक मजबूत पक्ष म्हणून समोर आला. त्यानंतर आता अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

केंद्रात लोकपाल कायदा मंजूर करण्यात आला आहे. पण, राज्यात अद्यापही लोकायुक्त कायदा मंजूर करण्यात आला नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी राज्यात लोकायुक्त कायदा लागू करावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.

राज्यातील सरकार पडण्याला घाबरतंय. त्यामुळे आम्ही ठरवलंय, राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी आंदोलन करायचं. आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगतोय की, आंदोलनाच्या तयारीला लागा. आम्ही सरकारला नोटीस देऊ आणि त्यानंतरच आंदोलनाला सुरवात करू, असंही अण्णा हजारे यांनी म्हटलंय.

दरम्यान, सरकार बहुमताच्या जोरावर वाटेल ते कायदे मंजूर करून घेत आहे. मात्र, जनता कुंभकर्णासारखी झोपलीये. लोकायुक्त कायदा लागू केला तर आमदार, मुख्यमंत्र्यांविरूद्ध कारवाई केली जाऊ शकते, असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आगीतून फुफाट्यात! विश्वचषकाच्या तोंडावर राशिद खाननं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

रविंद्र जडेजाच्या घरी रंगला ‘राजकीय सामना’; नणंद भावजय आमने- सामने

‘जर ‘या’ नियमांचा भंग झाला तर कलम 144 लागू करणार’; विश्वास नांगरे पाटलांचा इशारा

बाबो! मुलाने हात जोडून उकळत्या पाण्यात सुरु केलं ध्यान, पाहा व्हिडीओ

पुण्यात मुसळधार पाऊस! राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More