नागपूर महाराष्ट्र

मी एवढ्यात रिटायर्ड होणार नाही; रामराजेंच्या वक्तव्यानं हशा

नागपूर | मला जीवनगौरव पुरस्कार मिळाला असला तरी मी एवढ्यात रिटायर्ड होणार नाही, असं वक्तव्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं आहे. विधान परिषदेत त्यांच्या वक्तव्यानं हशा पिकला. 

जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे आमदारांनी रामराजे यांचं अभिनंदन केलं. त्यावेळी सगळ्यांचे आभार मानत मी रिटायर्ड होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

दरम्यान, विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ वाढल्याने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना भगवद्गीता भेट!

-…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती

-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-सरकार शेतकरी नेत्यांचे फोन टॅप करत आहे; राजू शेट्टींचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या