उदयनराजेंविषयी बोलण्याची माझी लायकी नाही; त्यांचा मला सार्थ अभिमान- रामराजे नाईक निंबाळकर

सातारा | राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी आपला भाजप प्रवेश जाहीर केला आणि त्यानंतर चहुबाजूंनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या. फलटणचे राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

उदयनराजेंविषयी बोलण्याची माझी लायकी नाही. मात्र राजे काहीही करू शकतात. ते आऊट ऑफ द पार्टी पॉलिशिटीशियन आहेत. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!, असं रामराजे यावेळी म्हणाले.  

एकाच पक्षात असताना रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यात त्यांचा छत्तीसचा आकडा असायचा मात्र उदयनराजेंनी भाजप प्रवेश जाहीर केला आणि रामराजेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज(शुक्रवार) महामेळाव्याचं आयोजित केला होता. कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराच्या बातम्या येत आहेत त्यामुळे काही कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत. त्यासाठीच हा मेळावा आपण घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-