सातारा | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्याऐवजी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्याने 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर प्रेम केलं आहे, त्यामुळे त्यांना ‘माढ्या’सोबत ‘सातारा’ही पर्यांय म्हणून आहे, असंही रामराजे म्हणाले आहेत.
शरद पवारांनी माढ्यातून लढावं अशी जोरदार मागणी पक्षाकडून केली जात होती. त्या मागणीला शरद पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, साताऱ्यातून निवडणूक लढल्यास राष्ट्रवादीचे सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या विक्रमी विजयासाठी झटतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल माने म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-कुलदीप यादवने निवडलंय नवीन प्रोफेशन, तुम्ही वाचाल तर चकीत व्हाल!
-राहुल गांधींच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळेच काँग्रेस सोडली, माजी परराष्ट्रमंत्र्याचा खुलासा
–तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या
-राजकारणात खुनशी वृत्ती वाढीस लागलीय- एकनाथ खडसे
–‘बाद’ फलंदाज पुन्हा मैदानात, क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं!