रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख नीतू कपूरने केली जाहीर, पाहा व्हिडीओ
मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप रंगत आहेत. त्यामुळे या दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत.
अखेर आलिया आणि रणबीर आजच लग्न करणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. रणबीरची आई व अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) व बहिण रीधिमा कपूर (Ridhima Kapoor) यांनी लग्नाच्या तारखेबद्दल माहिती दिली आहे.
रणबीर आणि आलियाचं लग्न आज म्हणजेच 14 एप्रिल रोजी होणार असल्याचं नीतू कपूर यांनी सांगितलं आहे. बुधवारपासूनच रणबीर आणि आलियाच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरूवात झाली आहे. करिना कपूर, करिश्मा कपूर, अदर जैन, करण जोहर, अनुष्का रंजन यासारख्या अनेक कलाकारांनी आलिया व रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शनला हजेरी लावली.
दरम्यान, आलिया व रणबीर आज रणबीरच्या ‘वास्तु’ या निवावस्थानी विवाहबंधनात अडकणार आहेत. चाहते मोठ्या आतुरतेने या जोडीच्या लग्नसमारंभातील फोटोंची वाट बघत आहेत.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
धनंजय मुंडेंचा रूग्णालयातील पहिला फोटो समोर, पाहा फोटो
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; सरकारने दिला मोठा दिलासा
“…तर अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”
“खरे मास्टरमाईंड तर उद्धव ठाकरे”; सोमय्यांच्या आरोपाने खळबळ
रावसाहेब दानवेंकडून महाविकास आघाडीला अमर, अकबर, अँथनीची उपमा, म्हणाले…
Comments are closed.