स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा, मोदीला सत्ताधाऱ्यांची फूस???

नवी दिल्ली | पीएनबी घोटाळ्यावरुन आता जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. काँग्रेसने याप्रकरणी भाजपवर जोरदार हल्ला चढवला असून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी याप्रकरणी ट्विट केलेत. 

नीरव मोदी नक्की कोण आहे? हा घोटाळा करण्यासाठी त्यांनी ‘द न्यू मोदीस्कॅम’चा वापर केलाय, असा आरोप रणदीप सूरजेवाला यांनी केलाय. 

दरम्यान, ललित मोदी आणि विजय माल्ल्या यांच्याप्रमाणे नीरव मोदी यांनाही सरकारमधील कोणीतरी पळून जाण्यासाठी मदत केलीय का? असा सवाल त्यांनी केलाय. तसेच हा स्वातंत्र्यानंतरचा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचंही त्यांनी म्हटलंय.