बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या रंगोली चंडेलला मोठा दणका

मुंबई | अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेलचं ट्विटर अकाऊंट काही वेळासाठी बंद करण्यात आलं आहे. ट्विटरचे नियम मोडल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

कंगना जरी सोशल मीडियावर सक्रिय नसली तरी तिची बहीण रंगोली ट्विटरवर नेहमीच चर्चेत असते. कंगनाविषयी किंवा इतर चालू घडामोडींवर ती सतत ट्विट करताना दिसते. मात्र या ट्विट्सद्वारे द्वेष पसरवला जात असल्याने ट्विटरने तिचा अकाऊंट सस्पेंड केला आहे.

नेहमीच वादग्रस्त ट्विट करण्यासाठी रंगोली प्रसिद्ध आहे. ट्विटरद्वारे ती अनेकदा इतरांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसते. मात्र ते करताना ट्विटरच्या नियमांकडे तिने दुर्लक्ष केलं.

गेल्या काही दिवसांपासून ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट केल्याने चर्चेत होती. महाराष्ट्राला सक्षम नेतृत्वाची गरज आहे, असं म्हणत तिने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले…

उद्धव ठाकरे सरकार फेल, महाराष्ट्रात लष्कर बोलवा- नारायण राणे

महत्वाच्या बातम्या-

दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तात्पुरते बदलले; काँग्रेसच्या या दोन मंत्र्यांवर दिली जबाबदारी

…तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलात का?- संजय राऊत

SBI कडून ग्राहकांसाठी खुशखबर; कोणत्याही एटीएममधून कितीही वेळा पैसे काढा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More