Top News देश

पहिल्यांचा शपथ घेऊ द्या मग सांगतो मी का राज्यसभेवर जातोय…- रंजन गोगोई

नवी दिल्ली | माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवरच्या नियुक्तीनंतर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यांना राज्यसभेवर जाण्याची काय गरज पडली? असे सवाल लोक विचारू लागले आहेत. यावरच पहिल्यांचा शपथ घेऊ द्या मग सांगतो मी का राज्यसभेवर जातोय, असं गोगोई यांनी म्हटलं आहे.

मला अगोदर शपथ घेवू द्या त्यानंतर मी माध्यमांशी सविस्तरपणे बोलेल की मी हे पद का स्वीकारलं? आणि मी का  राज्यसभेवर जात आहे, असं गोगोई यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रपती नियुक्त सदस्यांपैकी एका सदस्याच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी घटनेच्या अनुच्छेद 80(1)(अ) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

दरम्यान, गोगोईंनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला होता. जवळपास 13 महिने त्यांनी सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळली. गेल्यावर्षी 17 नोव्हेंबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले होते. गोगोई यांनी आपल्या कार्यकाळात अयोध्या खटला आणि शबरीमाला मंदिरासारख्या महत्त्वपूर्ण प्रकरणांचा निकाल दिला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडाव नाहीतर… – रामदास आठवले

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!

महत्वाच्या बातम्या-

रंजन गोगोईंची राज्यसभेवर वर्णी म्हणजे मोदींनी पर्रिकरांचा केलेला अनादर- काँग्रेस

“कोणतीही लक्षण नाहीत तरी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला; दुर्लक्ष करू नका घरीच बसा”

“मुंबई लोकल 7 दिवस बंद ठेवल्यास कोरोना संसर्ग टाळता येईल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या