Top News महाराष्ट्र मुंबई

सचिनच्या घराबाहेर बॅनरबाजी करणाऱ्या ‘स्वाभिमानी’ मुलाचं नेमकं म्हणणं काय? पाहा व्हिडीओ-

मुंबई | भारताचा माजी खेळाडू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचा प्रवक्ता रणजीत बागलने सचिनच्या घराबाहेर उभ रहात केली आहे.

भारतरत्न सचिन जी तेंडुलकर यांनी शेतकऱ्यांबद्दल ट्विट करावं आणि आपल्या देशातील लढणाऱ्या शेतकऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करावी, अशी विनंती करण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मी सचिन यांच्या घराबाहेर मी आलो असल्यातं रणजित बागल यांनी म्हटलं आहे.

सचिन जी आपण शेतकऱ्यांसाठी आपण कधी ट्विट करणार आहात. एखाद्या देशाच्या प्रोपोगंडाविषयी आपण बोलत असतो, जेव्हा आपण देशातील संकटाविषयी बोलत असतो त्याचवेळी अन्नदाता असणारा शेतकरी संकटात असून त्याला उभारी देण्याची गरज आहे ती उभारी देणासाठी सचिन यांनी ट्विट करण्याचं एक औदार्य दाखवावं, ही विनंती महाराष्ट्रील नाही तर देशातील शेतकऱ्यांच्यावतीने करत आहे, असंही रणजित बागल म्हणाले.

दरम्यान, धावांचा पाऊस पाडून विश्वविक्रम केले असले तरी शेतकरी आऊतामागे शेतकरी ज्या धावा काढतो त्या धावा सचिनच्या धावांच्या बरोबरीच्या आहेत त्यामुळे सचिनजींच्या घरापुढे गेलो असल्याचं बागल यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

नवऱ्यानं बायकोला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं अन् त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

‘आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?’; ‘स्वाभिमानी’ पोराचं सचिनच्या घराबाहेर आंदोलन

‘रोज डे’ ठरला ‘लास्ट डे’, ‘या’ कारणामुळं पुणेकर तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल

‘मोदी है, मौका लिजिए’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

“राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या