महाराष्ट्र मुंबई

“…आता उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना भर चौकात फोडून काढावं”

मुंबई | जर कोणी वीर सावरकरांचा अपमान केला तर त्याला भर चौकात फोडून काढू, असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अनेकदा म्हणाले आहेत. आता त्यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल भर चौकात फोडून काढावंं, असं आवाहन वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे.

मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळं मी घाबरणार नाही. माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे. यावर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी आक्षेप घेत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधींचं नाव राहुल सावरकर नाही, ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा आम्हा सर्व सावरकरांना तोंड काळं करून फिरावं लागलं असतं, असा टोलाही रणजीत सावरकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, राहुल यांनी सातत्याने सावरकरांवर ब्रिटीशांची माफी मागितल्याचे आरोप केले. पण सावरकरांनी कधीही ब्रिटिशांची माफी मागितली नव्हती. त्यांनी अटी मान्य करून सुटका करून घेतली होती, हे जगजाहीर आहे, असंही रणजीत सावरकर यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या