सोलापूर | सोलापूरचे रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात झालाय. यानंतर त्यांचं सर्व स्तरावरून कौतुक केलं जातंय. तर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बार्शीत येऊन डिसले यांचा सन्मान केलाय.
यावेळी रणजित डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.
यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, “नुकत्याच विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक पार पडल्या. मात्र या यामध्ये शिक्षक नसलेला व्यक्ती शिक्षक आमदार होतो हे देशाचे दुर्दैव आहे.”
विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी रणजित डिसले यांची शिफारस करणार असल्याचं दरेकर म्हणाले. तसंच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून शिफारशीचं पत्र देण्याचं आश्वासन देखील दरेकर यांनी दिलंय.
महत्वाच्या बातम्या-
“आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त; आम्ही कृती आणि अॅक्शनवाले”
“कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही”
कोरोनाच्या लसीचा डोस घेतलेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण!
पुण्यापासून जवळ असलेल्या ‘या’ भागात उद्यापासून संचारबंदी
लस हे अमृत नाही, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत…- राजेश टोपे