बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गांधीजींच्या नावाने दिवसरात्र छाती ठोकणारे शरद पवार त्यांच्या पुण्यतिथीला चिकण मासे खातात?”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेेेंद्र आव्हाड यांनी शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यावर जेवणाचा आस्वाद घेतला. यावर स्वातंत्रवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी टविट केलं आहे.

गांधीजींच्या नावाने दिवसरात्र छाती ठोकणारे शरद पवार गांधीजींच्या पुण्यतिथीला तळलेले कोंबडी, मासे खाऊन गांधीजींचा पुण्यतिथी साजरी करीत आहेत. नशिब ही गोष्ट जेवणापुर्ती मर्यादित राहिली नाहीतर गांधीजींच्या आत्मानं स्वर्गात आपलं चैतन्य गमावलं असतं, असं रणजित सावरकर यांनी म्हटलं आहे.

विशेष बाब म्हणजे या शाही जेवणाचं नियोजन शहापूरच्या एका आदिवासीच्या घरात केलं होतं असंही सावरकर यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाडांचं ट्विट रिट्विट करत त्यांनी ही टीका केली आहे.

दरम्यान, या नेत्याला काय म्हणावं कुडाची झोपडी…आदिवासी मावशी ने केलेला स्वयपाक अन् तांदळाची भाकरी … भाजलेला कोंबड्याच्या रस्सा .. कनटोरल्याची भाजी….संस्मरणीय दिवस, असं ट्विट आव्हाडांनी केलं होतं.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“राज्य सरकार बदललं की, आधीच्या सरकारच्या चौकशीचं राजकारण सुरु होतं”

“SC आणि OBC बजेट एकत्र सादर करून केंद्र सरकारने भांडण लावण्याचं काम केलं”

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा साप शिडीच्या खेळाप्रमाणे आहे- नवाब मलिक

मोठे आकडे टाकून भुलभुलैय्या; छगन भुजबळांची अर्थसंकल्पावर टीका

अडीच वर्षाच्या चिमुकलीचा अनोखा पराक्रम; प्रबळगड कलावंतीणीचा सुळका केला सर!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More