बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून 4 लाखांची वसुली, तिघांना पकडले

पुणे | शहरी भागात वसूली करण्याचे किंवा खंडणी गोळा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वेगवेगळे कृत्य करून जनतेची लुट करण्यात येते. पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिऱ्याकडूनच खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. (ransom demanded from NCP office bearers)

प्लाॅटवर जाण्याकरिता असलेल्या रस्त्यावर मुद्दाम राडारोडा टाकून तो रोडा उचलण्यासाठी तब्बल 4 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. पैसे घेण्यासाठी आलेल्या तिघांना सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. दिपक विजय निंबाळकर, गणेश जगताप, अमर अबनावे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

खंडणी मागितल्यानंतर जुबेर बाबू शेख (Zubair Babu Sheikh) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. जुबेर शेख हे राष्ट्रावादी काँग्रेसचे शहर चिटणीस आहेत. तसेच जुबेर शेख यांचा प्लॉट खरेदीचा व्यवसाय आहे.  फिर्यादी यांच्या पिसोळी येथे दोन ठिकाणी मिळकती आहेत. प्लॉटकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिपक निंबाळकर याने जाणीवपूर्वक राडारोडा टाकला होता.

दरम्यान, हा राडारोडा उचलण्यासाठी दिपक निंबाळकर आणि त्यांच्या साथीदारांनी 4 लाख रूपयांची खंडणी मागितली. सापळा रचून आरोपींना पकडण्यासाठी सोमवारी शेख 4 लाख घेऊन कान्हा हॉटेल येथे गेले. त्यानंतर शेख यांच्याकडून ही रक्कम घेतांना पोलिसांनी खंडणीखोरांना पकडले. यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या

देवेंद्र फडणवीसांना पाहून काँग्रेसच्या आमदारानं काढला पळ, कारणही सांगितलं…

“वडिलांना वचन दिलं म्हणून दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं”

डीएसकेंना खरोखर आमदार चावला का?, आता नवीनच माहिती आली समोर

मालिका सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू खेळणार नाही!

रात्रीस खेळ चाले! फडणवीस आणि काँग्रेस आमदाराच्या गुप्तभेटीच्या चर्चेनं मोठी खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More