बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रणवीर-दीपिका झाले गुंठामंत्री! मुंबईमध्ये खरेदी केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची जमीन

मुंबई | बाॅलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. नेहमी आपल्या हटके लुकमुळे ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच या जोडीनं पुन्हा एकदा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. अलिबागमधील येथे 90 गुंठे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीसाठी मोजलेल्या रकमेचा आकडा ऐकून तुम्हीही अवाक व्हाल.

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे 90 गुंठ्याची जागा खरेदी केली आहे. या जमिनीसाठी रणवीर दीपिकानं तब्बल 22 कोटी रुपये मोजले आहेत. या जागेच्या रजिस्ट्रेशनसाठी या जोडीनं नुकतीच अलिबागच्या रजिस्ट्रार कार्यालयात हजेरी लावली होती.

जागेच्या काही कागदोपत्री कामाच्या पुर्ततेसाठी ते सोमवारी अलिबाग येथील रजिस्ट्रार कार्यालयात आले होते रणवीर-दीपिका आल्याचं समजताच रजिस्ट्रार कार्यालयाच्या बाहेर चाहत्यांची गर्दी पहायला मिळाली. आपल्या आवडत्या जोडीची झलक पाहण्यासाठी लोकांनी चांगलाच जमाव केला होता.

दरम्यान, अनेक कलाकारांनाही याठिकाणी जमिनी खरेदी केल्या आहेत. अनेकांना निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडतं म्हणून याठिकाणी जमिनी खरेदी करण्यावर कलाकारांचा कल पाहायला मिळतो.

थोडक्यात बातम्या –  

”ही’ गोष्ट करून मोदींनी दाखवून दिलं, ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’”

“शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावे पंजाबला त्रास देऊ नये”

‘ …तर कोरोनाची लसही ठरु शकते निरुपयोगी’; WHOच्या माहितीनं जगाचं टेन्शन वाढलं!

राज्यभर गाजलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची अखेर ‘या’ जिल्ह्यात बदली!

“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, मग रातोरात मुख्यमंत्री का बदलला?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More