दीपिका नव्हे, पहा कोणत्या अभिनेत्रीसोबत रणवीरने उधळले रंग

 मुंबई | बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह प्रत्येक सण उत्साहात साजरा करतो. त्याने यंदाची होळी ऑस्ट्रेलियन अभिनेत्री अनुषा आणि अमेरिकन रॅपर प्हरेल विल्यम्स या दोघांसोबत साजरी केली आहे. या होळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ त्याने ट्विटरवर शेेअर केले आहेत.

 ‘पद्मावत’चे टेन्शन आणि रिलीजनंतरचे सेलिब्रेशन हे दोन्ही त्याने या होळीत साजरे केले. यावेळी रणवीरने तुफान डान्स करत होळीची मज्जा लुटताना दिसतोय.  

‘पद्मावत’मध्ये अल्लाऊद्दीन खिलजीची दमदार भूमिका साकारलेला रणवीर आता पुन्हा नव्या रूपात आला आहे. रणवीर या फोटोंमध्ये क्यूट लूकमध्ये दिसत आहे.