जालना | एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोठचिठ्ठी देत राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान भाजप सोडल्यानंतर खडसेंनी केलेलं एक विधान पटण्यासारखं नसल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार रावसाहेब यांनी सांगितलं आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले, दिल्लीतील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने खडसेंना राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिलाय, असं खडसे म्हणाले, मात्र त्यांचं हे वक्तव्य कुणालाही पटण्यासारखं नाहीये. या उलट खडसेंनी पक्ष सोडू नये अशी भाजपच्या केंद्र आणि राज्यातील नेत्यांची इच्छा होती.”
दानवे पुढे म्हणाले, “खडसे यांना भाजपच्या कोणत्याही नेत्याने असा सल्ला दिला नसणार हे णी आतापर्यंतच्या राजकारणातील अनुभवावरून सांगू शकतो.”
“एकनाथ खडसेंना प्रदेशाध्यक्ष पद देऊनही त्यांनी नाकारलं. जर एकनाथ खडसे प्रदेशाध्यक्ष असते तर कदाचित खडसे मुख्यमंत्री असते, असं यापूर्वी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
“तंत्रमंत्र आणि जादूटोण्याच्या मदतीने लालूू यादव यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला”
फडणवीससाहेब काळजी घ्या अन् कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा- रोहित पवार
भाजप मंत्र्याने मतांसाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवलं डोकं; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
प्रत्येकाला मोफत लस मिळावी, सर्व देशवासियांचा तो अधिकार आहे- अरविंद केजरीवाल
“विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा, प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करावं”