बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करतो’; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. स्वातंत्रदिनादिवशीपासून लोकल सेवा चालू करण्यात आली होती. नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच त्यातून प्रवास करता येणार आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा कधी सुरू होणार?, असा सवाल सर्वांना पडला आहे. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई लोकल सेवा चालू करण्याबाबत केंद्र सरकारला कोणतीही अडचण नाही. कारण तशीही 15 ऑगस्टपासून लोकलसेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे आता परवानगी द्यायला केंद्राला कोणतीही अडचण नाही, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

कोरोना आता आटोक्यात आला आहे त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारला सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याबाबत पत्र पाठवलं तर आम्ही परवागनी देऊ, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. दानवेंनी यावेळी बोलताना राज्यभर चर्चेत असलेल्या अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केलं.

दरम्यान, तिन्ही पक्ष त्यांचे काही तरी राजकीय प्रॉब्लेम आहेत म्हणून ते सोबत आहेत. आता अनंत गीतेंनंतर एक एक जण प्रेस घेईन आणि अशाच प्रकारची वक्तव्य करतील, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांमुळे, अजित पवारांना राजकारणात संधी मिळाली मात्र त्यांनी घाण केली”

“शरद पवारांवर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार”

“अनंत गीतेंचं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारीत आहे”

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा घट; वाचा आजची आकडेवारी

“जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली, तिथे..”; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More