बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधी म्हणजे देवाला सोडलेलं जनावर- रावसाहेब दानवे

जालना |  आपल्या वक्तव्यांमुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे नेहमीच चर्चेत असतात. अशातच पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका करताना दानवेंची जीभ घसरली आहे. भाजपच्या जनआर्शीवाद जनयात्रेत बोलताना त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना शिवराळ भाषा वापरली आहे.

राहुल गांधी यांना कोणतेच काम नाही, आपण ज्याप्रमाणे गावामध्ये वळू सोडतो त्याप्रमाणे ते वागतात. ते देवाला सोडलेले  आहे मात्र कोणत्याच कामाचं नाही, असा शब्दात राहुल गांधींवर रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. मात्र एका केंद्रीय मंत्र्याने अशा भाषेत टीका करणं ही पहिलीच घटना आहे.

मराठवाड्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. यात्रा बदनापूर येथे पोहोचली तेव्हा दानवेंनी बोलताना अशा शिवराळ भाषेत टीका केली आहे.

काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी आणि मी गेली 20 वर्षे सभागृहात एकत्र आहोत. पण राहुल गांधी म्हणजे देवाला सोडलेला गोऱ्हा, मोरखी, वेसन नसलेला सांड, असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. रावसाहेब दानवेंनी केलेल्या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेस नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-  

महिला तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणात अण्णा हजारेंची उडी, म्हणाले…

“आपणच नियम करायचे आणि आपणच मोडायचे हे आमच्या रक्तात नाही”

राष्ट्रवादीचं महागाई विरोधात ‘जागरण गोंधळ’ आंदोलन; मुरळीचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

अफगाणिस्तानात भारतीय नागरिक अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; आली ‘ही’ माहिती समोर

कौतुकास्पद! तरुणीने अपंगत्वावर मात करुन केला डान्स, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More