बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रावसाहेब दानवेंनी सांगितला महाराष्ट्रातील करेक्ट कार्यक्रमाचा अर्थ, म्हणाले…

 नवी दिल्ली | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  महाराष्ट्रात योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असं म्हटलं होतं. आता भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या करेक्ट कार्यक्रमाचा अर्थ सांगितला आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, निवडणुकींच्यावेळी जनतेतून निवडून यावं लागतं. मग जिल्हा परिषद, विधानसभा किंवा पोटनिवडणूक असो. नुकतंच आम्ही पंढरपुरच्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला आहे. देलगूरच्या पोटनिवडणुकीत ताकद दाखवून देऊ त्याला म्हणतात करेक्ट वेळ.

ते पुढे बोलताना म्हणाले की, जनता 2024च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहे. या सरकारमध्येच वाद आहेत. त्यामुळेच ते जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आम्ही सरकार पाडण्याचा दावा कधीच केला नव्हता. आमच्या कोणत्याही नेत्याने असं वक्तव्य केलं नाही.

तसेच सरकार पाडण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सरकार पाडण्याच्या नादात नाही. राज्यातील सत्ताधारीच सरकार पाडण्याच्या वावड्या उठवून संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा देखील रावसाहेब दानवे यांनी  केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“राष्ट्रवादीने दगड मारला कशावरून, कुणी जर स्वत:च गाडीवर दगड मारून घेत असेल तर काय बोलायचं?”

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

“आरक्षण संपुष्टात आणणं हा भाजप आणि संघाचा डाव”

“पाण्याविना मासा तडफडतो तसा भाजप सत्तेविना तडफडत आहे”

“देवाच्या काठीला आवाज नसतो शंभर अपराध भरले की फटका बसतोच, पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More