पोलिसांनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारायला पाहिजे होती- दानवे

अहमदनगर | पोलिसांनी ऊसदर आंदोलनातील शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारायला पाहिजे होती. मात्र ती छातीत लागली, हे चुकीचं आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. 

मुख्यमंत्र्यांनी गृहखातं सांभाळण्यास सुरुवात केल्यानंतर करण्यात आलेला हा पहिलाच गोळीबार आहे. असा गोळीबार भविष्यात होणार नाही, याची खात्री ते बाळगतील, असंही त्यांनी सांगितलं.

आंदोलनातील जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ, तसेच शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासनही यावेळी दानवे यांनी दिलं.