रात्री उशिरापर्यंत मित्रासोबत फिरत होती म्हणून केला बलात्कार

नवी दिल्ली | राजधानी नवी दिल्लीत सुरु असलेलं बलात्कारांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता रात्री उशिरापर्यंत मित्रासोबत फिरत असणाऱ्या तरुणीवर गाझीपूरमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. 

पीडित तरुणी रात्री 8 वाजता आपल्या मित्रासोबत पेपर मार्केटमध्ये फिरत होती. आरोपीनं दोघांना दम दिला तसेच नैतिकतेचे धडे दिले त्यामुळे दोघे वेगवेगळ्या मार्गांनी तिथून बाहेर पडले. याच संधीचा फायदा घेत आरोपीनं पीडितेला रस्त्यात गाठलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेनं आपल्या घरच्यांना झालेल्या प्रकाराची कल्पना दिल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. वैद्यकीय तपासणीत तरुणीवर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालंय. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.