बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बचपन का प्यार’ फेम सहदेवला रॅपर बादशाहकडून मोठी ऑफर!

मुंबई | एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक शाळेचा गणवेश घातलेला मुलगा ‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार’ गाणं गाताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह याने व्हिडीओतील मुलाला भेटीचं निमंत्रण दिलं आहे.

बादशाहने स्वतः त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने सहदेवसोबत संपर्क साधला. बादशाहने मुलासोबत व्हिडीओ कॉलवर गप्पा मारल्या आणि त्याला चंदीगढला भेटायला बोलवलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा ओरिजनल व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. ज्यात एक शाळकरी मुलगा त्याच्या शिक्षकांसमोर ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ गाताना दिसतोय. सहदेवने गायलेल्या गाण्याला इन्स्टाग्रामवर 12 हजाराहून अधिक रील्स बनल्या आहेत. बड्या सेलिब्रिटी सहदेवच्या गाण्यांवर रील्स बनवतात.

दरम्यान, घरात टीव्ही, मोबाइल नाही. तसेच सहदेवचे वडील शेतकरी आहेत, असं सहदेवने सांगितलं. मी मोठा झाल्यावर गायक बनू इच्छितो, असंही त्याने सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

“नैसर्गिक आपत्ती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकारची रिक्षा पंक्चर”

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

उर्वरित आयपीएलचा मुहूर्त ठरला, या तारखेपासून पुन्हा रंगणार आयपीएलचा थरार!

धक्कादायक! महाराष्ट्रात महापुरामुळे बळी पडलेल्यांचा आकडा 137 वर

मुंबईकरांनी करून दाखवलं; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More