रायगड | कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांची कन्या अॅड. प्रतिक्षा लाड यांचा पराभव झाला आहे.
निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइंच्या युतीने विजय मिळवला असून 18 जागांपैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या आहे.
नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून सुवर्णा जोशी तर राष्ट्रवादीकडून अॅड. प्रतिक्षा लाड रिंगणात होत्या. यात सुवर्णा जोशी यांनी बाजी मारली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरपालिका-परिषद निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-परिवर्तन करायला निघालेल्या राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील सभेत राडा
-कुमारस्वामींनी दिली मुख्यमंत्रीपद सोडण्याची धमकी
-धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच हेलिकाॅप्टर भरकटलं!
-कर्जत नगर परिषदेवर युतीचा झेंडा
-निवडणूक लढणे म्हणजे काही सौंदर्य स्पर्धा नव्हे- मोदी