बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

या भाजपच्या नेत्यांवरील आरोपाचं पुढे काय झालं? राष्ट्रवादीचा पोस्टर्समधून किरीट सोमय्यांना सवाल

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलेला आहे. ते सतत आघाडी सरकारच्या कोणत्या ना कोणत्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावतानाच दिसत आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि किरीट सोमय्या यांच्यातील आरोप प्रत्यारोप वाढतानचा दिसत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसने किरीट सोमय्यांना पोस्टरमधून काही सवाल विचारले आहेत.

किरीट सोमय्या आणि आघाडी सरकार हा संघर्ष वाढतानाच दिसत आहे. आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुंबईत ‘जवाब दो किरीट सोमय्या’ ही मोहीम राबवण्यात आली असून यामध्ये किरीट सोमय्यांना पोस्टर्सच्या माध्यमातून काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामध्ये किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांंवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्या आरोपाचं पुढे काय झालं? असा सवाल विचारला आहे.

राष्ट्रवादीकडून मुंबई शहरात किरीट सोमय्यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी सध्या भाजपमध्ये असलेल्या नेत्यांवर लावलेल्या आरोपाचं पुढे काय झालं? असा सवाल विचारला आहे. यामध्ये इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे फोटो आहेत. या पोस्टर्सची सध्या चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्याकडून हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंचाही समावेश आहे. राणे यांच्यासोबतच आमदार विजयकुमार गावित, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, आमदार बबनराव पाचपुते यांच्यावरील आरोपाचं पुढे काय झालं? असा सवाल राष्ट्रवादीने या पोस्टर्सच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. किरीट सोमय्यांनी शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांपासूनच राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधण्यास सुरूवात केली होती. ही पोस्टरबाजीही त्याचाच परिणाम आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

समीर वानखेडेंच्या पाठीशी आहे ‘या’ व्यक्तीचा आशिर्वाद; क्रांती रेडकरने केला खुलासा

“महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती”

या अभिनेत्याला ओळखलत का? याआधी न्युड फोटोशुटमुळे आला होता चर्चेत

‘मी तुमच्यासाठी कपडे घालत नाही’, ट्रोलर्सवर भडकली ‘ही’ अभिनेत्री

महिन्याभरात सीएनजी गॅसचे दर दुसऱ्यांदा भडकले, जाणून घ्या नवे दर

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More