रत्नाई कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रुपाली शिनगारे ही राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

अहमदनगर |महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचा नुकताच 33 वा पदवीप्रधान सभारंभ पार पडला आहे. या सभारंभात रत्नाई कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रुपाली शिनगारे हिने बि.एस.सी एॅग्री या पदवीमध्ये विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला.

राज्यपाल सी.विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते रुपाली शिनगारे हिचा श्री. लक्ष्मीनारायण बिहारीलाल बिहानी राहुरी सुवर्ण पदक, स्व.वसंतदादा पाटील सुवर्ण पदक यांच्यासह इतर सहा पदक आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.

दरम्यान, ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन कृषी क्षेत्रात मिळवलेले तिचे यश खरंच उल्लेखनीय आहे. पुढे उच्च शिक्षण घेऊन कृषी संशोधन क्षेत्रात काम करण्याची भावना तिने कार्यक्रमात व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या –

-ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर एकदा हा धक्कादायक व्हीडिओ नक्की बघा…

-उर्जित पटेल यांचा राजीनामा प्रत्येक भारतीयासाठी चिंतेचा विषय- रघुराम राजन  

-70 वर्षात जे घडलं नाही ते आता घडलं; याचं श्रेय फक्त मोदींना- जितेंद्र आव्हाड

-अखेर विजय मल्ल्याचा खेळ खल्लास; लवकरच मल्ल्याला भारतात आणणार!

-धुळे महापालिकेच्या विजयी उमेदवारांची यादी जाहीर, पाहा कोण कोण जिंकलं…