Top News

रतन टाटा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार; म्हणाले…

नवी दिल्ली | भारतातील मोठे उद्योजक रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गौरवोद्वार काढलेत. कोरोनाच्या कठीण काळात परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिखाऊपणाचं किंवा वरवरचं काम केलेलं नसल्याचं, टाटा यांनी सांगितलंय.

रतन टाटा म्हणाले, “कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती ढासळली असताना देखील पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाचा मला आदर वाटतो. या काळात तुमचं नेतृत्व अढळ राहिलं, तुम्ही जबाबदाऱ्या झटकल्या नाहीत तसंच पुढे राहून देशाचं नेतृत्व केलंय.”

पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिवे बंद करण्यास सांगितलं. मोदींनी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. यामध्ये त्यांचं वरवरचं वाटणं आणि दिखाऊपणा नव्हता. मुळात देशाने एकत्र यावं हाच यामागील उद्देश होता.” असंही टाटा म्हणालेत.

रतन टाटा यांच्या म्हणण्याप्रमाणे, “गेल्या काही वर्षांत आपण एकत्रित आल्यावर अनेक गोष्टी केल्यात. अशा कठीण काळात जर आपण सगळे एकत्र राहिलो आणि मोदींनी जे सांगितलं त्याप्रमाणे वागलो तर जग म्हणेल की, या पंतप्रधानांनी जसं सांगितलं तसं घडून आलं.”

थोडक्यात बातम्या-

ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत- सुवेंदू अधिकारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन

कसोटीतील पराभवानंतर शास्त्रींना हटवून ‘या” माजी खेळाडूची प्रशिक्षकपदी नेमण्याची मागणी

99.9 टक्के नेत्यांची काँग्रेस अध्यक्षपदासाठी ‘या’ नावाला पसंती!

…अन् टीम इंडियाने 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडीत काढला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या