महाराष्ट्र मुंबई

“तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी”

मुंबई | दिल्लीतील काही लोक सतत टोमणे मारत असतात. त्यांना आपल्याला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मन की बातमध्ये म्हणाले. यावरून सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊतांनी टोला लगावला आहे.

राजकारणात दोन घ्यावे आणि दोन द्यावेत. भाजपची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील आणि सत्ताधाऱ्यांनी याची तयारी ठेवायलाच हवी, असं राऊत म्हणालेत.

काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वास आपण गांभीर्याने घेत नसल्याचं भाजपच्या नेत्यांनी एकीकडे सांगायचं आणि त्याच वेळी राहुल गांधी आमचा अपमान करतात, असं दुसऱ्या तोंडाने बोलायचं हे पांचट विनोदाचे लक्षण आहे. विधायक टीका करणे, सरकारच्या खोटेपणावर बोलणे यास राज्यकर्ते अपमान म्हणत असतील तर लोकशाहीचा अंतकाळ जवळ आला आहे, असा सूचक इशाराही सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आलाय.

सरकार किंवा राजा करतो, ते सर्व बरोबर या भूमिकेत आजचे सरकार आहे, याला अर्थ नाही. सध्याच्या रहाजवटीत लोकांच्या शेळ्या झाल्या आहेत. शेळ्या झालेले एकमेकांना सांगत आहेत की, मेंढपाळाने छान व्यवस्था केली, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

…चांगलं काम केलं तर नोटीस मिळत नाही- देवेंद्र फडणवीस

“ईडीला आता कुणी घाबरत नाही, शरद पवार आणि ठाकरेंना नोटीस आली पुढे काय झालं?”

‘इंग्रजी विक म्हणजे….’; मराठी मुलांना अभिनेता स्वप्नील जोशीने दिला हा मोलाचा सल्ला

“कुणालाही ईडीची नोटीस मिळाली की भाजपला समोर केलं जातं”

“मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या