बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहेत, खातात शिवसेनेचं पण जागतात शरद पवारांच्या निष्ठेला”

सांगली | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. काल भाजप नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केलेल्या चक्का जाम आंदोलनामुळे राज्यातील वातावरण आणखीच तापलं आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. अशातच आता भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांना बिनबुडाचा लोटा म्हणत गंभीर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहेत. अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही. हे खातात शिवसेनेचं पण जागतात शरद पवारांच्या निष्ठेला, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकेल, असा विश्वास आज व्यक्त केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. हे सरकार पाच वर्ष टिकेल याबद्दल शंका नाही, असा विश्वास शरद पवार यांनी आज व्यक्त केला आहे. शरद पवार बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

कुठल्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी यंत्रणेतील सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळे हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. त्यातूनच हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही, असं देखील शरद पवारांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, पण चिंता कायम, पाहा आकडेवारी

पुण्यातील 91 गावं कोरोना हाॅटस्पाॅट म्हणुन घोषित; कमी झालेली संख्या पुन्हा वाढली

“कंगनाचा इंदिरा गांधी चित्रपट फ्लॉप होणार, कारण…”

माझ्या 100 वर्षीय आईनेही लस घेतली, घाबरू नका- नरेंद्र मोदी

तीन पक्षांमध्ये मतभेद नाहीत, सरकार पाच वर्ष टिकणार- शरद पवार

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More