महाराष्ट्र मुंबई

“स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्यानंतर देश घडवण्यात काँग्रेसचं योगदान मोठं आहे”

मुंबई | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नसीम खान यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका करत, काँग्रेसच्या अंतर्गत गोष्टींमध्ये न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्यानंतर देश घडवण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता. काँग्रेस हा एक विचार होता व काँग्रेससाठी लोक लाठ्या खायलाही तयार होते. आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही, असं राऊत म्हणालेत.

UPA अधिक मजबूत होणं ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरु झाले आहे. UPA चं नेतृत्व कुणी करावं, हा वादाचा मुद्दा नाही. UPA भक्कम करावी व भाजपसमोर आव्हान उभं करावं, हा मुद्दा आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नितीश कुमारांनी जदयुचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले आहे. या सगळ्या घडामोडी देशातील विरोधी पक्षाने गांभीर्याने घ्यायला हव्यात, असा सल्लाही संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून सर्व विरोधकांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार”

चक्क शिक्षिका चालवत होती सेक्स रॅकेट; सत्य बाहेर येताच पोलीसही चक्रावले!

“पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार”

‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…’; कविता करत रामदास आठवलेंचा सरकारला टोला

…तर मी फासावर जायला तयार; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी ‘त्या’ युवतीचे आरोप फेटाळले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या