कोहलीनंतर सचिनचीही प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींना पसंती

Photo Source- Twitter

मुंबई |खुद्द सचिन तेंडुलकरनेच रवी शास्त्रींना भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदासाठी अर्ज करायला लावल्याचं समोर येतंय. त्यामुळे शास्त्रींची प्रशिक्षकपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक नेमण्याचं काम क्रिकेट सल्लागार समिती करते. या समितीत सचिन तेंडुलकरसह सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांचा समावेश आहे. यातील खुद्द सचिननेच रवी शास्त्रींना अर्ज करायला सांगितल्याने त्यांचं पारडं जड मानलं जातंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या