“राज ठाकरे तुम्ही संभाजी महाराजांच्या चरणी नाक घासून माफी मागा”
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील जाहिर सभेपूर्वी नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी राज ठाकरेंचा एक जूना व्हिडीओ शेअर करत टीकेची झोड उठवली आहे.
औरंगाबाद येथे जात असताना राज ठाकरे तुळापूरला छत्रपती संभाजी महाराज यांचं दर्शन घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. यावरून रविकांत तुपे यांनी राज ठाकरेंचा एक जूना व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात राज ठाकरे यांनी संभाजी महारांजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
संभाजीराजे वडिलांशी भांडून मोघलांना जाऊन मिळाले होते हे देखील तितकंच सत्य आहे, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं. यावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला चाललाच आहात तर आता महाराजांच्या चरणी नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा, असं आव्हान रविकांत वरपे यांनी राज ठाकरेंना केलं आहे.
दरम्यान, ज्या पद्धतीनं बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली आहे त्याच पद्धतीने राज ठाकरेंनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. ही गुरू शिष्याची परंपरा जुनी आहे, असा टोला देखील रविकांत वरपे यांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
भाषणापूर्वी ‘अशी’ असते राज ठाकरेंची अवस्था, शर्मिला ठाकरेंनी केला खुलासा
“पाणी डोक्यावरून जात असेल तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल”
सभेच्या एक दिवस आधी राज ठाकरेंचा मोठा गौप्यसफोट, म्हणाले…
“उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज ठाकरे बाळासाहेबांसोबत राज्यभर दौरे करत होते”
राज ठाकरेंच्या सभेआधी अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.