भाजप राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा फोनवरुन शिवीगाळ करतानाचा व्हीडिओ व्हायरल

कल्याण | राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत ते रस्त्यावर उभे राहून कुणाला तरी शिवीगाळ करताना दिसत आहे. 

महिन्याभरापूर्वीचा हा व्हीडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. तुझा बाप बोलतोय राज्यमंत्री, असं ते म्हणताना दिसत आहेत. याशिवाय शिवीगाळही करत आहेत. 

रवींद्र चव्हाण कुणाला शिवीगाळ करत होते हे कळू शकलेलं नाही, मात्र पोलिस किंवा पालिकेच्या अधिकाऱ्यांशी ते बोलत असावेत, असा अंदाज आहे. 

रवींद्र चव्हाण यापूर्वीही वादात सापडले होते. फेरीवाल्यांना त्यांनी शिवीगाळ केली होती तसेच शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुरुंगात गेलो तरी चालेल; रात्री 10 नंतरच फटाके फोडणार- भाजप खासदार  

-ओवेसींच्या नाडीत प्रकाश आंबेडकरांची मान अडकली आहे- शिवसेना

-प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी समाजाचे मालक नाहीत; वंदे मातरम् म्हणावंच लागंल

-बीडमध्ये भगवा फडकवण्याचा शिवसेनेचा निर्धार; पंकजा मुंडेंविरोधात लढण्याची तयारी

-बाळासाहेबांच्या पाठीत तुम्हीच खंजीर खुपसला, उद्धव ठाकरेंचा भुजबळांवर पलटवार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या