बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे

अहमदनगर | राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. कोण निर्णय घेतंय, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडीवर सडकून टीका केली आहे

रावसाहेब दानवे अहमदनगर येथे आयोजित भाजप कारखानदारांच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. कोण निर्णय घेतंय, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील केलं जात नाही असं म्हटलं. याचाच अर्थ राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्य सरकार आता कोरोना रुग्णांकडे दुर्लक्ष करत आहे. आधी राज्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्यांना तात्काळ वेगळं करुन त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांच्या कोरोना चाचणी केल्या जायच्या. मात्र आता केवळ त्या रुग्णाची चाचणी होते आणि त्यांना घरीच क्वारंटाईन केलं जातं. त्यामुळेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केलाय.

ट्रेंडिंग बातम्या-

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण

“तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार”

महत्वाच्या बातम्या-

मुंबईत एकाच दिवशी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू!

“कोरोनाचं संकट गेल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही”

संवेदनशील छत्रपती; बळीराजाचं दुःख न पाहवल्याने राजेंनी स्वतः तिफन ओढली! पाहा व्ही़डिओ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More