बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पैशासाठी आम्ही पगडी घालत नाही’; पंजाबच्या हरप्रीतचा अक्षय कुमारला टोला

मुंबई | आरसीबीविरूद्धच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केलेल्या पंजाबच्या हरप्रीत ब्रारने बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारवर टोला लगावला आहे. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबीला बाद करत रातोरात स्टार झालेल्या हरप्रीत ब्रारने थेट अक्षय कुमारवर ट्विट करत निशाणा साधला आहे.

एका चाहत्यानं हरप्रितला तू सिंग इज ब्लिंग मधला अक्षय कुमार दिसतो असं म्हटलं. मात्र या कमेंचा फोटो ट्विट करत त्यावर हरप्रितनं पैशांसाठी पगडी परिधान करत नाही, अशी पोस्ट केली. विशेष म्हणजे यासोबत हरप्रितनं #isupportfarmers असा हॅशटॅगही पोस्ट केला आहे.

शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून हरप्रीत ब्रारने अक्षयला सुनावलं आहे. अक्षयने सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘सिंग इज ब्लींग’ चित्रपटात पगडी घातलेला शीख व्यक्ती साकारला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. क्रिकेटच्या मैदानावर गवसलेल्या या नव्या हिरोला सामाजिक भान असल्याचंही पाहायला मिळालं आहे. आता या यशाच्या मार्गावर तो किती पुढं जाणार हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, आरसीबीच्या सामन्यात हरप्रीत ब्रारने एका षटकात सामना झुकवला. त्याने लागोपाठ विराट कोहली आणि मॅक्लवेलला बाद केलं. त्यानंतर पुढच्या षटकात खतरनाक एबी डिव्हीलीअर्सलाही बाद केलं. हरप्रीत ब्रार हा सामन्याचा सामनावीर ठरला होता.

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक

“बड्या राजकीय हस्तींनी मला…”; लंडनला गेलेल्या अदर पुनावालांचा धक्कादायक खुलासा

मुलांना कोरोनाची लागण झाली तर काय कराल?; केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्वाची माहिती

ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर केंद्राने द्यावं, मग तुम्ही काय झोपा काढताय?- चंद्रकांत पाटील

पुण्यात फार्महाऊसवर नाचगाणं, पैशांचा पाऊस अन् पोरी, पोलिसांची रेड पडताच गदारोळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More