बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संगीत क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी सावनीची वाचा कहानी

मुंबई | राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलेली सावनी रविंद्रने संगीत क्षेत्रात आपल्या आवाजाची छाप उमटवली आहे. संगीताचा वातावरण असलेल्या कुटुंबात सावनीचा जन्म झाला असून आपल्या आई-वडिलांकडून सावनीने संगीताचा वारसा लहानपणीच घेण्यास चालू केला होता.

सावनीच्या वडिलांचं नाव डाॅ. रविंद्र घांगुर्डे तर आईचं नाव वंदना घांगुर्डे असं आहे. हे दोघेही संगीतकार आहेत. घरात संगीताचं वातावरण असलं तरी सावनीने मात्र गायक व्हायचं ठरवलं नव्हतं.

घरातील संगीताच्या संस्काराने सावनी एका गायिक बनली. सावनीने रवी दाते यांच्याकडून गजल संगीताचं प्रशिक्षण घेतलं. एवढचं नाही तर तिने पंडित पंढरीनाथ केल्हापुरे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं.

मंगेशकर घराण्यासोबत सावनीच्या घराचे चांगले संबंध असून पंडित मंगेशकर यांच्याकडून देखील सावनीने संगीताचे धडे घेतले आहेत. एवढचं नाही तर प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि त्यांची बहीण आशा भोसले यांची मैफील ‘लताशा’ हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून सावनी करत आहे.

सावनीने महाविद्द्यालयात जर्मनवर जोर दिला असून बी.ए. संस्कृत तर एम.ए. मराठी केलं आहे. त्यानंतर तिने संगीतातील पदवी प्राप्त केली.

सावनीने फक्त मराठीचं नाहीतर तेलगु, मलायम, कन्नड, तामिळ अशा अनेक भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत. तसेचं अनेक देशांमध्ये तिचे कार्यक्रम देखील झाले आहेत.

दरम्यान, सावनीच्या या संगीताच्या प्रवासात आता सावनीला 67 व्या ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कर’ सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

सचिन वाझेंनी दिलेला जबाब खोटा; ‘त्याच’ गाडीत मनसूख हिरेन यांची हत्या?

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

बँक संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे फक्त 3 दिवस; ‘या’ कारणाने पुढचे 8 दिवस बँक राहणार बंद

इंग्रजी शिकताना झाली गंमत, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More