Top News

…तर उपसभापतीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासही तयार- अशोक चव्हाण

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी योग्य ती पावलं उचलत नसल्याचा आरोप करण्यात येतोय. मात्र यामध्ये अजिबात तथ्य नसून मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास थेट राजीनामा देणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीच्या माध्यमातून आपण प्रामाणिक प्रयत्न केलेत. असं असूनही आपल्यावर आरक्षण मिळवण्यासाठी योग्य ती पावलं न उचलल्याचा आरोप होतोय. यात तथ्य नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आपण तात्काळ राजीनामा देऊ.”

ठमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी व्हावी, ही राज्य सरकारची मागणी आहे. आणि यासाठी रितसर प्रयत्न सुरूयेत. आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे मांडण्यासाठी 10 तज्ज्ञ वकिलांची फौज देखील नेमण्यात आलीये,” अशी महिती देखील चव्हाण यांनी दिलीये.

दरम्यान, हे प्रकरण घटनापीठाकडेच जावं अशी सर्वांचीच मागणी आहे. पण दीड महिन्यापूर्वीच सरकारने ही मागणी का केली नाही?, असा सवाल करत समाजातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पॉवर-प्लेमध्ये हैदराबादच्या वॉर्नर आणि साहाने दिल्लीकरांना दणका देत केला मोठा पराक्रम

कमल नाथ, दिग्विजय सिंह हे प्रदेशमधील मोठे सर्वात मोठे गद्दार- ज्योतिरादित्य शिंदे

“ब्राह्मणांना भाजपशिवाय पर्यायच नाही, इतर ठिकाणी त्यांना सन्मान मिळत नाही’; भाजप नेत्याचं वक्तव्य

‘पराभव साजरा करायलाही नशीब लागतं’; धनुभाऊंना पंकजाताईंकडून प्रत्युत्तर!

जम्मू-काश्मिरमध्ये जमीन खरेदी करता येणार मात्र अद्यापही ‘या’ जमिनी खरेदी करता येणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या