बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘विषाणू ऐवजी ‘वसुली’ टार्गेट ठेवलं आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं’

सातारा | महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुढच्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्या नंतर विरोधकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, उद्योजकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत आणि फेसबुकपासून ट्विटपर्यंत सर्वत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर टीकेची झोड उठली आहे. आता भाजपचे आध्यात्मिक समन्वय आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

‘उद्धवजी, तुमच्या सरकारने ‘विषाणू’ ऐवजी ‘वसुली’ टारगेट ठेवलं आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं उद्धव ठाकरे होय तुम्हीच जबाबदार’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागलेली आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला आहे.

थोडक्यात बातम्या –  

कोरोनाची दुसरी लाट सर्वात खतरनाक, मुंबईची दिवसभराची आकडेवारी अत्यंत धक्कादायक

“उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा”

पुण्यात 6 ते 6 संचारबंदीचा पहिलाच दिवस अन् कोरोनाबाधितांचा आकडा काळजाचा थरकाप उडवणारा!

लसीकरणानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात का? तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्टीकरण

‘आयपीएल’ सुरू होण्यास फक्त 6 दिवस शिल्लक असताना; ‘या’ मैदानात खेळाडूंच्या आधी कोरोनाची ‘एन्ट्री’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More