सातारा | 15 जानेवारी राजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे.
कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना कोरेगाव तालुक्यात धक्का बसला आहे.साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेनं आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. कोरेगावातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील चार ग्रामपंचायती शिवसेनेकडं आल्या आहेत.
राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यावेळी सरासरी ७९ टक्के मतदान झालं. तर काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीत बिनविरोधी निवडणूक पार पडल्या त्यामुळं आज एकूण 2 लाख 15 हजार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
दरम्यान,कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील मिणचे ग्रामपंचायत शिवसेनेकडं गेली आहे.
थोडक्यात बातम्या-
तांडव वेब सीरिजच्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल
भास्करराव पेरे पाटलांना मोठा धक्का; पाटोदा ग्रामपंचायतीत सर्वात धक्कादायक निकाल
30 वर्षानंतर निवडणूक; पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारमध्ये असा लागला निकाल!
“शरद पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करू नये”
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज होणार जाहीर!
Comments are closed.