बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्वारंटाईन संपलेल्या आजोबांना आणायला गेले नातेवाईक, समोर आला अत्यंत धक्कादायक प्रकार

पालघर | महाराष्ट्र भारत सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच वसई-विरार महापालिका हद्दीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

82 वर्षाच्या रामचंद्र दास यांना 22 एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली असल्याने उपचारासाठी महापालिकेच्या वरुण इंडस्ट्रीज येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 5 मे रोजी त्यांचा क्वारंटाईन काळ पूर्ण होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता.

14 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना रुग्णालयातून घरी नेण्यासाठी वरूण इंडस्ट्रीज येथील कोविड सेंटरमध्ये पोहोचले पण तिथे गेल्यानंतर रामचन्‍द्र दास हे तिथे नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर याबाबत तेथील कर्मचाऱ्यांशी विचारणा केली पण पालिकेच्या सेंटरमध्ये त्यांच्या कोणत्याही नोंदी आढळल्या नाही. त्यामुळे एकच खळबळ माजली.

दरम्यान, याप्रकरणात सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रामचन्‍द्र दास कोरोना सेंटरमधून नेमके गेले कुठे? या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वसई महापालिकेचे उपायुक्त किशोर गवस यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. पण रुग्णावर उपचार सुरु असताना असा रुग्णालयातून एखादा रुग्ण गायब होत असेल तर ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचं गंभीर चित्र पाहायला मिळत आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’; गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात

उत्तराखंडात पुन्हा ढगफुटी; घर, दुकानं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक, पण मृतांचा आकडा वाढला

चिंता वाढली! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव, 10 रूग्ण बाधित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More