बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गडकरींची कमाल! वर्ध्यातून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

नागपूर | सध्या देशभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. अशा गंभीर परिस्थितीत देशातील नागरिक हा लढा देत असताना काही लोक नागरिकांच्या गरजेचा फायदा घेत असल्याचं चित्र समोर येत आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन संपूर्ण देशातच कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातही या इंजेक्शनचा तुटवडा आहे. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कमाल करत दिलासा दिला आहे.

वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीला रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवण्याची परवानगी नितीन गडकरी यांनी मिळवून दिली. त्यानंतर आज कंपनीतून रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर पडला आहे. वर्धा इथं उप्तादित झालेले हे इंजेक्शन नागपूरसह राज्यभरात वितरीत केले जाणार आहेत. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका व्हर्च्युअल सभेत हे इंजेक्शन सुपुर्द करण्यात आले.

या पहिला स्टॉकमधील एकूण सतरा हजार इंजेक्शन वापरास सज्ज झाले आहेत.  वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत 5 मे रोजी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात झाली होती. राज्यात इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे काही समाजकंटकांनीदीड हजार रुपये किमतीचं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 30 ते 40 हजारांना विकल्याचं अनेक घटनांमधून समोर आलं.

दरम्यान, ‘कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती.

 

थोडक्यात बातम्या- 

लग्नाची खरेदी करताना मायलेकींना कोरोनाची लागण; आईच्या अंत्यसंस्कारावेळीच लेकीनेही सोडले प्राण

महत्त्वाची बातमी! लसीच्या दोन डोसमध्ये असावं इतक्या दिवसांचं अंतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

कोरोनाचा ‘शक्तिमान’लाही फटका! आयसीयू बेड न मिळाल्याने मुकेश खन्नांच्या घरातील व्यक्तिचं कोरोनाने निधन

कोरोनाची नवी लक्षणं आली समोर; ‘ही’ लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा

लाईव्ह शो चालू असताना झाला बॉम्बब्लास्ट, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More