बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दमदार फिचर्ससह Kiger कॉम्पॅक्ट SUV भारतात लाॅन्च; किंमत पण फारच कमी…

नवी दिल्ली | रेनॉल्ट इंडियाने नविन Kiger कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच केली आहे. कॉम्पॅक्ट एसयुव्हीच्या ग्राहकांमध्ये आकर्षण वाढवण्यासाठी कंपनीने अनेक तंत्रांवर काम केलं आहे. यासोबतच Kiger ला नव्या लुकमध्ये कंपनीने अपडेट केलं आहे. रेनॉल्ट काइगरने 2021 च्या सुरूवातीला भारतात कार लाँच केली होती. रेनॉल्ट काइगर जागतिक एनसीपी क्रश चाचणीमध्ये चार स्टार सुरक्षा रेटिंगसह येते.

या नविन मॉडेलची किंमत 5.84 लाख रूपयांपासून सुरू आहे. KIGER MY22 प्रगत वैशिष्ट्ये आणि सुविधांसह सादर केलेलं आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. या कारमध्ये मल्टी-सेन्स ड्रायव्हिंग मोड, केबिन स्टोरेज आणि कार्गो स्पेस असणार आहे. अनेक कंपन्यांनी प्रोडक्ट लाँच केलेले आहेत. स्वस्तात कार खरेदी करण्यासाठी हा चांगला पर्याय असणार आहे.

फ्रान्स आणि भारताच्या डिझाइन टीमच्या परस्परांमधील सहकार्यामुळे (2022 Renault KIGER price) कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. भारतात सर्वप्रथम सादर करण्यात येणारे हे कंपनीचे तिसरे मॉडेल आहे. त्यानंतर आंतराष्ट्रीय स्तरावर लाँच केले जाणार आहे.

दरम्यान, KIGER MY22 दोन इंजिन पर्यायांसह वायरलेस स्मार्टफोन चार्जिंगसारख्या इतर वैशिष्ट्यांसह असणार आहे. कंपनीला 2021 मध्ये भारतात यश मिळाल्यामुळे आंतराष्ट्रीय स्तरावर लाँच केले होते. या कारमध्ये मल्टि सेन्स ड्रायविंग मोड, केबिन स्टोरेज आणि कार्गो स्पेसचा समावेश असणार आहे. आलिशान इंटीरियर आणि डॅशबोर्ड तुम्हाला चांगला अनुभव देते, असं कंपनीने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुढील 3 ते 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट; ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी

आघाडीत बिघाडी???, आमदारांच्या नाराजीनंतर नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले…

“जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी… तेणे पत्थ्य सांभाळावी”, मोदींना खोचक टोला

“गली गली में शोर है, भाजपवाले चोर है”, दरेकरांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

“नीरव मोदींच्या बंगल्याप्रमाणे नारायण राणेंचा अधीश पाडा”, प्रकरण सुप्रीम कोर्टात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More