Top News तंत्रज्ञान देश

आतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…

Photo- From Renault's Facebook Page

मुंबई | फ्रेंच वाहन उत्पादक कंपनी रेनॉल्ट आज भारतीय बाजारात आपली सर्वात स्वस्त SUV सादर करणार आहे. Kiger असं या SUVचं नाव आहे. भारतीय बाजारात सध्या असलेल्या SUVच्या तुलनेत ही सर्वात स्वस्त SUV असण्याची शक्यता आहे.

Kiger ची किंमत रेनॉल्टकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र 5 लाख रुपयांच्या दरम्यान तिची एक्स शोरुम किंमत असेल असं सांगितलं जात आहे. ही एसयूव्ही सादर झाल्यानंतरच यासंदर्भातील अधिकृत घोषणा होणार आहे.

Kiger ची स्पर्धा भारतीय बाजारात सध्या असलेल्या टाटा नेक्सॉन, किया सोनेट तसेच फोर्ड इकोस्पोर्ट या गाड्यांसोबत होईल. या गाड्यांच्या किंमतीशी तुलना करता 5 लाख ही सर्वात कमी किंमत ठरण्याची शक्यता आहे.

भारतीय ग्राहकांना SUV गाड्यांकडे वाढता कल आहे. टाटांच्या नेक्सॉनला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे इतर कंपन्यांनी देखील या स्पर्धेत उडी घेतली आहे. निस्सानची मेग्नाईट देखील याच कॅटेगरीत असून तिलाही सध्या जबरदस्त मागणी आहे.

Renault Kiger ची ही वैशिष्ट्ये असू शकतात-

-आकर्षक एलईडी टेललँम्प क्लस्टर

-रिफ्लेक्टरसह हाई माऊंट स्टॉप लॅम्प

-स्क्लप्टेड टेलगेट

-ब्ल्ॅक बम्पर क्लोडिंग्ज

-१६ इंचाचे अलॉय व्हिल्स

-ब्लॅक बी पिलर

-रेग्यूलर पूल टाईट डोअर हँडल्स

-१.० लिटर टर्बो पेट्रोल इंजीन

-सीव्हीटी संचलित ट्रान्समिशन

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात!

बायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य!

‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी

‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या