Top News महाराष्ट्र मुंबई

बलात्काराच्या तक्रारीसंदर्भात धनंजय मुंडे यांना सर्वात मोठा दिलासा

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरुन धनंजय मुंडे अडचणीत सापडले होते. परंतू आता या प्रकरणात त्यांना दिलासा मिळताना दिसत आहे.

मुंडेंविरोधात तक्रार करणारी महिला रेणू शर्मानं यूटर्न घेत केलेली तक्रार मागं घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. रेणू शर्मानं केलेला नवा दावा नाकारु नये या करता पोलिसांनी तिला आपलं म्हणणं प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्यास सांगितलं होतं.

रेणू शर्मानं यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र अखेर पोलिसांना सादर केलं आहे. यामध्ये मी केलेली तक्रार मागं घेत असल्याचं तीनं म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खासगी कारण सांगत रेणू शर्माच्या वकिलांनी ही केस सोडली होती, तसेच तुम्हाला हवं असेल तर मी माझी तक्रार मागे घेते असं रेणू शर्मा यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मोदींनी ज्या इमारतीला भेट दिली त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली”

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली!

वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ‘या’ माजी आमदाराला तीन महिन्यांचा कारावास!

“भाजपने अद्यापही सुशांत सिंहच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही”

सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या